३२ वा महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह

“विश्वशांती आणि मानवकल्याणाकरिता” तसेच मुंबई शहरातील जनतेला निसर्गाचा आनंद आणि स्वतःची अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच नैतिक प्रगती करता यावी, यासाठी या आश्रमाची स्थापना प.पू. स्वामी गगनगिरी महाराजांनी स्वतः केली.
“बाबांनो तुम्ही मला बोलावता, म्हणून मी येथे येतो.” हे महाराजांचेच शब्द आहेत. म्हणून गेली ३२ वर्ष या मनोरी आश्रमात महासिद्धयोगी स्वामी गगनगिरी महाराज दर्शन सोहळा सप्ताह साजरा होत आहे. या सोहळ्या दरम्यान प. पू.स्वामी गगनगिरी महाराज साक्षात येथे मुंबईमधील भाविकांना आशिर्वादरूपी दर्शन देत असत. तसेच भाविक भक्तगण होम-हवन, पूजन आणि अन्नदानाचा लाभ घेत असत.
अजूनही हीच भावना मनात ठेवून सर्व सेवेकरी आणि भाविक हा सोहळा श्रद्धेने साजरा करत आहेत आणि हर्ष उल्हासात महोत्सव साजरा करताना महाराजांचे स्नेह आणि आशिर्वाद प्राप्त करत आहेत.
तर मुंबई महाराष्ट्राच्या सर्व भाविक जनतेला, आपणही या सोहळ्यात सहभागी होऊन आदीदत्तात्रय सदगुरू प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांचे स्नेह आणि आशिर्वाद प्राप्त करून परमोच्च अशा अलौकिक आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी सदिच्छा आणि सदगुरू चरणी प्रार्थना.
जय गगनगिरी 🌺